14.5 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ जाहीर….*; *बुलढाणा जिल्ह्यातील चार मानकरी ठरले…*

बुलढाणा

*‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ जाहीर….*;

*बुलढाणा जिल्ह्यातील चार मानकरी ठरले…*

राज्यातील व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी दिला जाणारा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ सन 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निर्णयात बुलढाणा जिल्ह्यातील विविध गटात चार जण मानकरी ठरल्याने जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, वैयक्तिक पुरस्कारासाठी रु. 15,000 रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल किंवा साडी, तसेच श्रीफळ देण्यात येणार आहे. तर संस्थात्मक पुरस्कारासाठी रु. 30,000 रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी निवड प्रक्रिया राज्यस्तरीय समितीद्वारे पार पडली असून, सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 2020-21 ते 2024-25 या कालावधीतील पात्र व्यक्ती व संस्थांची निवड केली आहे. या निवडीस मुख्यमंत्री यांची अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, काही निवडी चारित्र्य पडताळणी अहवालाच्या अधीन ठेवण्यात आल्या असून, संबंधित अहवाल प्राप्त करण्याची जबाबदारी समाजकल्याण आयुक्त, पुणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निवड झालेल्या सर्व मानकऱ्यांनी पुरस्कारासाठी आवश्यक अटी व निकष पूर्ण केले असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पात्रता पूर्ण झाल्यानंतरच सर्व सुविधा देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठीची निवड अंतिम राहणार असून, त्याविरुद्ध अपील करता येणार नाही. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात येणार असून, पुढील कार्यवाही समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चार मानकऱ्यांची निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून, सामाजिक क्षेत्रातून याचे स्वागत केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या