बुलढाणा
*“आंबेडकरी विचारांचा दीप उजळणारा स्मृतिग्रंथ” – प्रा. डॉ. व्ही.के. क्षीरसागर गुरुजी स्मृतिदिनानिमित्त भव्य प्रकाशन व अभिवादन कार्यक्रम…*
बुलढाणा येथे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. व्हि. के. क्षीरसागर गुरुजी यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित स्मृतिग्रंथाचे प्रकाशन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत समाज परिवर्तनाच्या चळवळीत तब्बल ५१ वर्षे कार्यरत राहिलेल्या क्षीरसागर गुरुजींच्या कार्याचा गौरव या निमित्ताने केला जाणार आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा “आंबेडकरी अस्मितेचं तारांगण” हा स्मृतिग्रंथ या कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे….
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अॅड. जे.एस. काकडे (बुलढाणा) भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून मा. प्रा. डॉ. संतोष बन्सोड (सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ), मा. प्रा. डॉ. अरुण रोंगळे, मा. रमेश घेवडे (निवृत्त जिल्हाधिकारी), मा. अॅड. विजयकुमार कस्तुरे, मा. प्रा. डॉ. के.बी. इंगळे आणि मा. डी.एस. वानखेडे (गट शिक्षणाधिकारी) उपस्थित राहणार आहेत…
कार्यक्रम दिनांक: रविवार, २९ मार्च २०२६..
वेळ: सकाळी १०:३० वाजता..
स्थळ: जिजामाता महाविद्यालय सभागृह, बुलढाणा..
समस्त क्षीरसागर परिवार व स्नेहीजन यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम केवळ स्मृतिग्रंथ प्रकाशनापुरता मर्यादित नसून, आंबेडकरी विचारांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे…



