12.3 C
New York
Sunday, April 19, 2026

Buy now

spot_img

नांदुरा तालुका शेतकरी संघटनेची स्थापना; कार्यकारणी घोषित…* *शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर लढा देण्याचा निर्धार…*

बुलढाणा

*नांदुरा तालुका शेतकरी संघटनेची स्थापना; कार्यकारणी घोषित…*

*शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर लढा देण्याचा निर्धार…*

नांदुरा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी चांदूर बिसवा येथे नांदुरा तालुका शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली असून कार्यकसरणी घोषित करण्यात आली. या संघटनेची उभारणी शरद जोशी यांच्या विचारधारेवर आधारित असल्याचे यावेळी सांगण्यात आले….
या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष दामोदर शर्मा, रंजीत डोसे, बाबुराव पाटील, तसेच शेतकरी नेते सुनील करांगळे, नंदू बारस्कर, विकास शास्त्री, भाऊराव काकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते…..
या वेळी संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानुसार *विठ्ठल वानखडे यांची तालुका अध्यक्षपदी, मोहन रोहनकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली*. तसेच विजय बडे, विजय डोळे यांची सचिवपदी, सुरेश सपकाळ यांची संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
युवा आघाडीत प्रकाश देशमुख यांची युवा अध्यक्ष, मोहम्मद परवेज यांची युवा उपाध्यक्ष, राजू हिवराळे यांची युवा सचिव, तर विष्णू हागे यांची युवा संघटक म्हणून निवड करण्यात आली. अल्पसंख्यांक विभागात अब्दुल मजीद, सलीम खान, शेख जाहीर यांची निवड करण्यात आली…..
कार्यक्रमादरम्यान अनेक शेतकरी बांधवांनी संघटनेत प्रवेश केला. “जय जवान, जय किसान”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकरी व शेतमजुरांच्या हक्कांसाठी संघटना सदैव तत्पर राहील, असा एकमुखी निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या