बुलढाणा
*रामनवमीनिमित्त शेगावात भाविकांचा महासागर….*;
*श्री संत गजानन महाराज मंदिर 24 तास खुले…*
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथे भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून श्री संत गजानन महाराज मंदिर आज आणि उद्या २४ तास भाविकांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
उद्या रामनवमी असल्याने राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावकडे रवाना झाल्या असून आजपासूनच लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात भक्तांचा प्रचंड ओघ सुरू असून सर्वत्र ‘जय गजानन’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आहे.
रामनवमी निमित्त मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यासाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.
शेगाव नगरी सध्या पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली असून रामनवमी उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.



