29.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

मिशन परिवर्तन” अंतर्गत मोठी कारवाई….* *अंढेरा हद्दीत अवैध अफू शेती उद्ध्वस्त, ९.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त…*

बुलढाणा

*“मिशन परिवर्तन” अंतर्गत मोठी कारवाई….*

*अंढेरा हद्दीत अवैध अफू शेती उद्ध्वस्त, ९.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त…*

बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या “मिशन परिवर्तन” मोहिमेला मोठे यश मिळाले असून, पोलीस स्टेशन अंढेरा हद्दीत अवैध अफूची लागवड करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईत तब्बल ११ किलो ४७९ ग्रॅम अफूची झाडे (ओलसर अफू) जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत ९ लाख १८ हजार ३२० रुपये इतकी आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अफू, गांजा व इतर अमली पदार्थांची लागवड, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते…
गुप्त माहितीच्या आधारे पो. स्टे. अंढेरा हद्दीतील मेरा शिवारात छापा टाकण्यात आला. येथे आरोपी कृष्णा हरिराम वाघमारे (वय २६, रा. मेरा खुर्द, ता. चिखली, जि. बुलढाणा) याने स्वतःच्या शेतात वांग्याच्या पिकामध्ये अफूची झाडे लावून त्यांची संगोपन व साठवणूक केली असल्याचे उघड झाले…
पोलीस पथकाने पंचासमक्ष कारवाई करत आरोपीकडून ११ किलो ४७९ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त केली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अमली औषध व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) कलम ८(क), १८(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन अंढेरा करत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीणिक लोढा (खामगाव), अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकर (बुलढाणा), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम (देऊळगावराजा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पो.नि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउनि. अविनाश जायभाये, एएसआय राजकुमार राजपूत, पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, गजानन दराडे, गणेश पाटील, शेख चाँद, युवराज राठोड, तसेच महिला पोलीस कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग घेतला….
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अमली पदार्थांविरोधात सुरू असलेली ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे…

Related Articles

ताज्या बातम्या