15.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्ह्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन तीव्र…* *मुंबईपासून जानेफळपर्यंत आंदोलनाचा जाज्वल्य लढा…*

बुलढाणा

*बुलढाणा जिल्ह्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन तीव्र…*

  1. *मुंबईपासून जानेफळपर्यंत आंदोलनाचा जाज्वल्य लढा…*

राज्यभरात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र होत असून, बुलढाणा जिल्ह्यातही या आंदोलनाने वेग घेतला आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे धनगर आरक्षणासाठी नेते दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ (खामगाव रोड) येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदोलन सम्राट यशवंत सेनेचे बुलढाणा संपर्कप्रमुख गजानन बोरकर यांनी तब्बल २०० फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे.
“जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही,” अशी ठाम भूमिका बोरकर यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे परिसरात तणावपूर्ण आणि लक्षवेधी परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक उग्र स्वरूप प्राप्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या