23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा राजकारणात मोठा उलथापालथ! 500 कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत भव्य प्रवेश; भाजपाला मोठा धक्का …

बुलढाणा ब्रेकिंग…

बुलढाणा राजकारणात मोठा उलथापालथ! 500 कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत भव्य प्रवेश; भाजपाला मोठा धक्का …

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आज मोठी राजकीय घडामोड घडली असून विविध पक्षांतील तब्बल 500 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला. या भव्य प्रवेशामुळे चिखली मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत.
या प्रवेश सोहळ्याचे नेतृत्व आमदार संजय गायकवाड यांनी केले. त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रवेशामध्ये भाजपचे सुमारे 250, उबाठाचे 40, काँग्रेसचे 35, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे 50 तसेच इतर पक्ष व संघटनांतील जवळपास 100 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या मोठ्या प्रमाणातील प्रवेशामुळे विशेषतः भाजपाला चिखली तालुक्यात मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. स्थानिक पातळीवर याला भाजपासाठी मोठा धक्का मानले जात असून आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यावर जोरदार टीका करत वातावरण तापवले. त्यांनी स्थानिक विकासकामे, पक्षाची भूमिका आणि नेतृत्वावर सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली.
विशेष म्हणजे, चिखली तालुक्यातील तब्बल 30 गावांमधील पदाधिकाऱ्यांनी या वेळी शिंदे सेनेत प्रवेश घेतल्याने पक्षाची ग्रामीण भागातील पकड अधिक मजबूत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या “टोलेजंग” प्रवेशामुळे शिंदे सेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
एकूणच, या भव्य प्रवेश सोहळ्यामुळे चिखली मतदारसंघात आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या