23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण तापले; दोषींवर तात्काळ कारवाईची शिवसेना (उबाठा)ची मागणी … समाजमाध्यमांवरील व्हिडिओमुळे दहशतीचे वातावरण; आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप…

बुलढाणा

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण तापले; दोषींवर तात्काळ कारवाईची शिवसेना (उबाठा)ची मागणी …

समाजमाध्यमांवरील व्हिडिओमुळे दहशतीचे वातावरण; आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप…

मेहकर (प्रतिनिधी)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार  सिद्धार्थ खरात  यांच्याविषयी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिल्याच्या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर तसेच ठाणेदार, मेहकर यांना  निवेदन देण्यात आले….
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दि. २२ मार्च २०२६ रोजी दुपारनंतर एका व्हिडिओद्वारे Uddhav Balasaheb Thackeray यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य करण्यात आले. तसेच आमदार Siddharth Kharat यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
यामध्ये आरोपी संदीप तट्टे याने अत्यंत आक्षेपार्ह व दादागिरीची भाषा वापरत “घरातून ओढून मारू”, “आमच्यावर २०-२५ गुन्हे आहेत, आम्ही घाबरत नाही” अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण होऊन सामाजिक व राजकीय तेढ वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, संबंधित आरोपींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आमदार Siddharth Kharat यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.
निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुकाप्रमुख निंबाभाऊ पांडव, शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष किशोर गारोळे, युवा शहरप्रमुख आकाश घोडे, तालुका समन्वयक संजय वडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या