23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

देवघरातील अपघात ठरला जीवघेणा; पत्रकार जितेंद्र कायस्थ यांना मातृशोक…. प्रयागबाई कायस्थ (वय ७६) यांचे उपचारादरम्यान निधन; इकबाल नगर येथे अंत्यसंस्कार

बुलढाणा फ्लॅश

देवघरातील अपघात ठरला जीवघेणा; पत्रकार जितेंद्र कायस्थ यांना मातृशोक….

प्रयागबाई कायस्थ (वय ७६) यांचे उपचारादरम्यान निधन; इकबाल नगर येथे अंत्यसंस्कार..

बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा येथील पत्रकार जितेंद्र कायस्थ यांच्या मातोश्री प्रयागबाई कायस्थ (वय ७६) यांचे दुर्दैवी निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे कायस्थ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरातही शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागबाई कायस्थ या देवघरात दिवा लावत असताना अपघाताने त्यांच्या अंगावर दिवा पडला. या घटनेत त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या. घटनेनंतर त्यांना तातडीने औरंगाबाद येथील मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील डॉ. संचेती यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
आज त्यांच्यावर बुलढाणा शहरातील इकबाल नगर परिसरातील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.
प्रयागबाई कायस्थ यांच्या निधनामुळे कायस्थ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या