*बुलढाणा फ्लॅश*
*रेती माफीयाने शेतकऱ्यावर उगारली कुऱ्हाड….
*शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यापासून रोखलं…..
*वडनेर भोलजी परिसरात शेतकऱ्यांमध्ये रेती माफीयांची दहशत…..
बुलढाणा जिल्ह्यात रेती माफी यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र आहे जिल्ह्यातील वडनेर भोलजी येथील शेतकरी शेर खान आमिर खान हे त्यांच्या शेतात गेले असता परिसरातील वाळूमाफिया असलेला एजाजखान मिलखान व जावेद खान मिल खान यांनी शेतकरी शेरखान यांना कुराडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. घटनास्थळी दोघांमध्ये वाद होऊन एजाज खान यांनी शेतकऱ्यावर चक्क कुऱ्हाड उगारली. याप्रकरणी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये एजाज खान व जावेद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



