23.9 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा बसस्थानकाची अंतिम पाहणी; स्वच्छता अभियानात चौथ्या फेरीत सखोल तपासणी…* *प्रवाशांच्या सुविधांवर विशेष लक्ष; पुणे पथकाकडून सर्व घटकांची बारकाईने पाहणी…*

बुलढाणा

*बुलढाणा बसस्थानकाची अंतिम पाहणी; स्वच्छता अभियानात चौथ्या फेरीत सखोल तपासणी…*

*प्रवाशांच्या सुविधांवर विशेष लक्ष; पुणे पथकाकडून सर्व घटकांची बारकाईने पाहणी…*

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाअंतर्गत बुलढाणा येथील बसस्थानकाची चौथ्यांदा व अंतिम पाहणी पुणे येथील विशेष पथकाने केली. या पाहणीमध्ये बसस्थानक परिसरातील स्वच्छता आणि प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.
पथकाने बसस्थानक परिसरातील एकूण स्वच्छता, पुरुष व महिला शौचालयांची स्थिती, बगीचा व हिरवळ यांची निगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच बसफेऱ्यांची माहिती देणारे फलक यांची तपशीलवार तपासणी केली. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक बाबीची बारकाईने पडताळणी करण्यात आली.
या पाहणी पथकामध्ये पुणे येथील दोन महिला अधिकारी, एक पत्रकार तसेच प्रवासी संघटनेचा एक सदस्य अशा चार जणांचा समावेश होता. त्यांनी पाहणीदरम्यान काही आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, त्या अंमलात आणण्याबाबतही निर्देश दिले आहेत.
यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाच्या अंतिम टप्प्यातील ही पाहणी असल्यामुळे आता या अहवालाच्या आधारे बसस्थानकाच्या दर्जाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या