15.2 C
New York
Saturday, April 18, 2026

Buy now

spot_img

इराण-इजराइल-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर युनूस शाह यांचे उमरा यात्रेसाठी प्रस्थान..* *शाह बिरादरीकडून भावपूर्ण निरोप; मक्का-मदीनाच्या पवित्र यात्रेसाठी दुआंचा वर्षाव…*

बुलढाणा

*इराण-इजराइल-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर युनूस शाह यांचे उमरा यात्रेसाठी प्रस्थान..*

*शाह बिरादरीकडून भावपूर्ण निरोप; मक्का-मदीनाच्या पवित्र यात्रेसाठी दुआंचा वर्षाव…*

अमोल साळवे

जागतिक स्तरावर इराण, इजराइल व अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील युनूस शाह मिया शाह यांनी पवित्र उमरा यात्रेसाठी मक्का व मदीनाकडे प्रस्थान केले आहे. या पावन क्षणी शाह बिरादरीकडून त्यांना अत्यंत भावपूर्ण व उत्साहपूर्ण निरोप देण्यात आला. उमरा यात्रेसाठी रवाना होत असलेल्या युनूस शाह यांना शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रवासाच्या यशस्वितेसाठी दुआ करण्यासाठी बिरादरीतील मान्यवर व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये फखरू शाह, रहीम शाह, इब्राहिम शाह, निसार शाह, इस्माईल शाह, मंसूर शाह, रिजवान शाह, कासीम शाह, असलम शाह, अशफाक शाह, आसिफ शाह, तहेजीब शाह, जुबेर शाह, महेबुब शाह, अफजल शाह यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. या प्रसंगी उपस्थितांनी युनूस शाह यांच्या सुखकर, सुरक्षित व यशस्वी उमरा यात्रेसाठी मनापासून प्रार्थना व्यक्त केल्या. धार्मिक वातावरण, श्रद्धा व भावनिक क्षणांनी भारलेला हा निरोप समारंभ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.

Related Articles

ताज्या बातम्या