18.2 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात कुरेशी कॉन्फरन्सचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न…. राज्यभरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार; जाकीरभाई कुरेशी यांच्या नेतृत्वाचे कौतुक…

बुलढाणा

बुलढाण्यात कुरेशी कॉन्फरन्सचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात संपन्न….

राज्यभरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार; जाकीरभाई कुरेशी यांच्या नेतृत्वाचे कौतुक….

बुलढाणा शहरात कुरेशी कॉन्फरन्सचे चौथे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
यावेळी कुरेशी कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सनोवर अली (दिल्ली) यांचे जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला कलाम साहब कुरेशी (झांसी), हाजी मुख्तार (मुंबई), आसीफ भाई (मुंबई), मोईन खलील मॅडम (पुणे), रफीक सेठ (चिखली), दाऊद सेठ (जिल्हाध्यक्ष, बुलढाणा), अफसर सेठ (बुलढाणा), डॉ. मुनीरा कुरेशी (मुंबई), इलियासजी बेपारी (भंडारा), सय्यद लाल (मलकापूर) यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जाकीरभाई कुरेशी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या