31.4 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

भीम जयंतीनिमित्त ‘ब्ल्यू स्टार’ ग्रुपचा भव्य डान्स; १४ एप्रिलला जयस्तंभ चौकात सादरीकरण… ५० महिलांचा सहभाग, आम्रपाली अवसरमोल यांचे मार्गदर्शन; शहरात उत्सुकतेचे वातावरण..

बुलढाणा

भीम जयंतीनिमित्त ‘ब्ल्यू स्टार’ ग्रुपचा भव्य डान्स; १४ एप्रिलला जयस्तंभ चौकात सादरीकरण…

५० महिलांचा सहभाग, आम्रपाली अवसरमोल यांचे मार्गदर्शन; शहरात उत्सुकतेचे वातावरण..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी प्रथमच ‘ब्ल्यू स्टार’ ग्रुपच्या माध्यमातून भीम गीतांवर आधारित भव्य नृत्य सादरीकरण होणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी जयस्तंभ चौकात या नृत्याचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला जाणार असून नागरिकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या उपक्रमासाठी आम्रपाली ताई अवसरमोल यांनी पुढाकार घेत सुमारे ५० महिला व विद्यार्थिनींचा ग्रुप तयार केला आहे. गेल्या आठवडाभरापासून या सर्व सहभागी महिलांनी नृत्याची जोरदार सरावही केली आहे. बुलढाणा शहरातील असंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे या ‘ब्ल्यू स्टार’ ग्रुपमध्ये सहभाग नोंदविला आहे.
विशेष म्हणजे, कोणत्या भीम गीतावर नृत्य करायचे आणि त्याची मांडणी कशी असावी, हे सर्व नियोजन आम्रपाली ताई यांनी स्वतः केले आहे. तसेच, नृत्य अधिक आकर्षक व्हावे यासाठी कोरियोग्राफरची व्यवस्था करून सर्वांना व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या अनोख्या उपक्रमामुळे भीम जयंती साजरी करण्याचा एक वेगळा आणि प्रेरणादायी प्रयत्न यंदा बुलढाण्यात पाहायला मिळणार आहे. सध्या या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात असून १४ एप्रिल रोजी धुमधडाक्यात हे सादरीकरण होणार असल्याची माहिती आम्रपाली ताई अवसरमोल यांनी दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या