*बुलढाणा ब्रेकींग*
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख 90 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे ..
पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवले राजीनामा चे पत्र ..
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष एड नाझेर काझी यांना विधानपरिषद उमेदवारी न मिळाल्याने दिले राजीनामे ..
काझी हे अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुद्धा आहेत ..
काझी यांची विधानपरिषद वर जाण्याची अनेक वर्षांपासून इच्छा ..
तर सामुहिक राजीनामा मुळे पदाधिकाऱ्यांची बैठक रद्द करण्याची नामुष्की.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आज सायंकाळी मोठ्या राजकीय ड्रामा बघायला मिळाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचे एडवोकेट नाझेर काझी यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या 90 हून अधिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांची भेट घेत सामूहिक राजीनामे दिले आहेत. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी मकरंद पाटील हे बुलढाण्यात आलेले आहेत त्यांनी आज सायंकाळी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठकही बोलावली होती मात्र तत्पूर्वीच जिल्ह्यातील बड्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याने ही बैठक रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी जिल्हा पक्षावर आलेली आहे. उद्याही जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.



