*बुलढाणा ब्रेकिंग …*
*राज्यात 102 रुग्णवाहिका सेवा विस्कळीत; चालकांच्या संपामुळे रुग्णांचे हाल…
*कमी पगार, कंत्राटी पद्धतीचा विरोध; मागण्यांसाठी चालकांचा एल्गार*
महाराष्ट्रातील राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा (NAS) अंतर्गत चालणारी 102 रुग्णवाहिका सेवा सध्या अनेक ठिकाणी विस्कळीत झाली असून, याचा थेट फटका रुग्णांना बसत आहे. गर्भवती महिला, नवजात बालके आणि सामान्य रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही सेवा चालकांच्या संपामुळे अडचणीत आली आहे.
राज्यात शेकडो रुग्णवाहिका कार्यरत असल्या तरी, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने सेवा अंशतः ठप्प झाली आहे. परिणामी, ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत…..
दरम्यान, रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. यात किमान वेतन लागू करणे, कायमस्वरूपी नोकरी देणे, कंत्राटी पद्धती बंद करणे, 8 तासांची ड्युटी निश्चित करणे, थकबाकी वेतन तात्काळ देणे तसेच विमा संरक्षण देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. अनेक चालकांनी दीर्घकाळापासून कमी पगार आणि असुरक्षित नोकरीमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला असून, प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रुग्णवाहिका सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चा निर्णायक ठरणार आहे…..
प्रवीण उमाळे, रुग्णवाहीका चालक बुलढाणा यांची माहिती…



