14.7 C
New York
Friday, May 15, 2026

Buy now

spot_img

रद्द झालेली NEET परीक्षा आता 21 जूनला; केंद्र सरकारचा निर्णय…*

मुंबई

*रद्द झालेली NEET परीक्षा आता 21 जूनला; केंद्र सरकारचा निर्णय…*

*पुन्हा परीक्षा देण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी…*

देशभरात 3 मे रोजी पार पडलेली NEET परीक्षा आता पुन्हा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या तब्बल 42 तास आधी काही जणांच्या हाती लागल्याचा आरोप समोर आल्यानंतर केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दरम्यान आता केंद्र सरकारने 21 जून रोजी NEET परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा केली आहे. मात्र पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारच्या निर्णयावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या