बुलढाणा ब्रेकिंग
*NEET परीक्षेमुळे MAHATET परीक्षा पुढे ढकलली..*
*आता २८ जून रोजी होणार शिक्षक पात्रता परीक्षा; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घोषणा..*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी आयोजित केलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा रविवार दि. २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार होती. मात्र त्याच दिवशी देशभरात NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याने दोन्ही परीक्षांची केंद्रे बहुतांश ठिकाणी एकच येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षार्थ्यांच्या हिताचा विचार करून आता MAHATET परीक्षा रविवार दि. २८ जून २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे परिषदेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशपत्रे १६ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन उपलब्ध राहणार आहेत. पेपर क्रमांक १ सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत होईल, तर पेपर क्रमांक २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पार पडणार आहे. परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे…



