24 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

*“आहो ऐकता का?” ची राज्यभर चर्चा; बुलढाण्याच्या डॉक्टर विवेक इंगळे यांच्या सुरांनी जिंकली रसिकांची मनं…

बुलढाणा

*“आहो ऐकता का?” ची राज्यभर चर्चा; बुलढाण्याच्या डॉक्टर विवेक इंगळे यांच्या सुरांनी जिंकली रसिकांची मनं…*

*दवाखान्यात उपचार अन् स्वरांतून प्रेमाची हाक; डॉक्टर विवेक इंगळे यांचा मराठी अल्बम ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू…*

वैद्यकीय क्षेत्रात आपल्या सेवाभावी कार्याने ओळख निर्माण करणारे बुलढाण्यातील नामवंत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विवेक इंगळे आता आपल्या सुरेल आवाजामुळे राज्यभर चर्चेत आले आहेत. “आहो ऐकता का?” या त्यांच्या नव्या मराठी व्हिडीओ अल्बमने सोशल मीडियावर आणि संगीतप्रेमींच्या मनात अक्षरशः धूम माजवली आहे. डॉक्टरकीचा व्यस्त व्यवसाय सांभाळत त्यांनी जपलेला गायनाचा छंद आज एका सुंदर कलाकृतीच्या रूपाने रसिकांसमोर आला आहे.
लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या डॉ. विवेक इंगळे यांनी शब्द, सूर आणि भावना यांची सांगड घालत स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांच्या वेदना कमी करणारे हे डॉक्टर आता आपल्या गाण्यांमधून नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणाचा स्वर जागवत आहेत. “आहो ऐकता का?” हे गाणे केवळ एक गाणे नसून प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनातील हळुवार भावना व्यक्त करणारी प्रेमळ साद ठरत आहे.
सकाळच्या चहाच्या कपापासून ते रात्रीच्या गप्पांपर्यंत घराघरांत ऐकू येणारी “अहो ऐकता का?” ही हाक आता संगीताच्या माध्यमातून नव्या अंदाजात रसिकांच्या भेटीला आली आहे. गाण्यातील भावस्पर्शी शब्द, मधुर संगीत आणि आकर्षक सादरीकरणामुळे हा व्हिडीओ अल्बम सर्व स्तरांतून पसंती मिळवत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात डॉ. इंगळे यांनी केवळ गायनच नाही तर ग्रुप डान्सच्या माध्यमातून अभिनयाची झलकही दाखवली आहे.
व्यवसायाने डॉक्टर आणि मनाने कलाकार असलेल्या डॉ. विवेक इंगळे यांच्या या कलाकृतीमुळे बुलढाण्याच्या सांस्कृतिक विश्वालाही नवी ओळख मिळाली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील साध्या पण भावनिक क्षणांना सुरांच्या माध्यमातून जिवंत करणारा हा अल्बम आता प्रत्येकाच्या ओठांवर झंकारताना दिसत आहे.
“तुमच्या अहोंसोबत, तुमच्या खास व्यक्तीसोबत हे गाणं नक्की ऐका,” असे आवाहन करत डॉ. इंगळे यांनी रसिकांना आपल्या या सुरेल प्रवासाचा भाग बनण्याचे निमंत्रण दिले आहे. प्रेम, आपुलकी आणि संसारातील गोड संवाद यांचे सुंदर प्रतिबिंब असलेले “आहो ऐकता का?” हे गाणे सध्या संगीतविश्वात विशेष आकर्षण ठरत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या