27.5 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्हा परिषदेत बदल्यांवरून खळबळ…* *वर्षानुवर्षे एकाच टेबलवर कर्मचाऱ्यांची मक्तेदारी…*

बुलढाणा ब्रेकिंग

*बुलढाणा जिल्हा परिषदेत बदल्यांवरून खळबळ…*

*वर्षानुवर्षे एकाच टेबलवर कर्मचाऱ्यांची मक्तेदारी…*

*बदली टाळण्यासाठी अनधिकृत कागदपत्रांचा आधार? वित्त विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह…*

बुलढाणा जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मक्तेदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही कर्मचारी १० ते १४ वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बदली टाळण्यासाठी जनगणना कामकाज, कर्मचारी संघटना आणि विविध कागदपत्रांचा आधार घेतला जात असला तरी त्यातील अनेक दावे अनधिकृत असल्याचे समोर येत आहे. तसेच, शासनमान्य नसलेल्या कर्मचारी संघटनांची पत्रे जोडून बदलीत सूट मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. एमएएफएस परीक्षा वेळेत उत्तीर्ण न होता पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचाही मुद्दा पुढे आला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी बदल्यांमध्ये पारदर्शकता राखून दीर्घकालीन मक्तेदारी मोडीत काढावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या