बुलढाणा ब्रेकिंग
*.apk फाईलमुळे मोबाईल हॅक; 10.51 लाखांची ऑनलाइन फसवणूक उघड..*
*सायबर पोलिसांची मोठी कारवाई, 8.57 लाख रुपये परत मिळवण्यात यश..*
देऊळगावराजा येथील शेतकरी सचिन विनायक जपे यांच्या मोबाईलमध्ये अज्ञात व्यक्तीने .apk फाईलद्वारे अनधिकृत प्रवेश करून मोबाईल हॅक केला. त्यानंतर मोबाईलवरील SMS वेगवेगळ्या क्रमांकावर फॉरवर्ड करत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 10 लाख 51 हजार 602 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण करून संबंधित बँक खात्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. सायबर पोलिसांनी 9 लाख 55 हजार रुपयांची रक्कम होल्ड करण्यात यश मिळवले असून त्यापैकी 8 लाख 57 हजार 470 रुपये न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम परत मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोधही सुरू आहे. दरम्यान, पोलिस *अधीक्षक निलेश तांबे यांनी* नागरिकांना व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या .apk फाईल डाउनलोड न करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाईन किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.



