31.4 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

नांदुरा हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई..* *५ टिप्पर जप्त; ७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ५ आरोपींवर गुन्हा दाखल..*

बुलढाणा ब्रेकिंग

*नांदुरा हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई..*

*५ टिप्पर जप्त; ७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ५ आरोपींवर गुन्हा दाखल..*

बुलढाणा जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिज (रेती) उत्खनन व चोरीची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. नांदुरा पोलीस हद्दीतील सावरगाव नेहू परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ५ टिप्पर पकडले असून सुमारे ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात विनापरवाना गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते….
दि. २१ मे २०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नांदुरा हद्दीतील सावरगाव नेहू परिसरात काही टिप्परद्वारे अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोउपनि पंकज सपकाळे यांच्या पथकाने रात्री सापळा रचून रस्त्यावर नाकाबंदी केली. या कारवाईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले …..

योगेश विजय काळे (वय ३०, रा. बेलाड, ता. मलकापूर)
आकाश सुरेश कंडारकर (वय २६, रा. घोडगा, ता. मलकापूर)
शुभम माणिक इंगळे (वय २६, रा. धरणगाव, ता. मलकापूर)
लक्ष्मण धोंडू चव्हाण (वय ३०, रा. नेहरूनगर, ता. मोताळा)
प्रल्हाद सुपडा नरवाडे (वय ४२, रा. मेंढळी, ता. मोताळा)
पोलिसांनी आरोपींकडून ५ टिप्पर किंमत अंदाजे ७५ लाख रुपये तसेच १० ब्रास रेती किंमत १ लाख रुपये असा एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे….

या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या