*बुलढाणा ब्रेकिंग*
*डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नागपूर पुणे मुंबई महामार्ग रोखला…
*खामगाव ते जालना दरम्यान शेतकऱ्यांचा टॅक्टर आडवे लावून दीड तासांपासून रस्ता रोको.*
*महामार्गावर भर उन्हात लांबच लांब रांगा.*

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे अक्षरशः वाहनधारक व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्रीपासून रांग लावूनही डिझेल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे ट्रॅक्टर आडवे लावून नागपूर पुणे – मुंबई महामार्ग गेल्या दीड तासांपासून रोखून धरला आहे त्यामुळे भर उन्हात महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ इंधन उपलब्ध करून द्या तसेच कॅन व ट्रॅक्टर मध्ये डिझेल देण्यात यावं अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे. या रास्ता रोको मुळे खामगाव जालना दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. आक्रमक शेतकरी सरकार विरोधी घोषणा देत आहेत.



