22.1 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

अनुसूचित जाती जमती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलढाण्यात पोलीस कार्यशाळा संपन्न

बुलढाणा

अनुसूचित जाती जमती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बुलढाण्यात पोलीस कार्यशाळा संपन्न
गुणवत्तापूर्ण तपास, पीडितांना तात्काळ न्याय व कायद्याची काटेकोर अंमलबजावणीवर भर

नागरी हक्क संरक्षण पथक, बुलढाणा यांच्या वतीने शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी प्रभा हॉल, पोलीस मुख्यालय बुलढाणा येथे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 तसेच सुधारित अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणी व गुणवत्तापूर्ण तपासासाठी विशेष पोलीस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
ही कार्यशाळा मा. अश्वती दोर्जे, अपर पोलीस महासंचालक, नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाची प्रस्तावना नागरी हक्क संरक्षण पथकाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना जाधव यांनी केली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. अमोल गायकवाड (म.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना अत्याचार प्रतिबंधक कायद्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रकरणांचा सखोल व निष्पक्ष तपास करण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेत सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री दिलीप तडवी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे, ॲड. दिपक मापारी तसेच ॲड. सानप, विधी व सेवा प्राधिकरण यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध तरतुदी, तपासाची प्रक्रिया, पीडितांना तात्काळ मदत व न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास, पुरावे संकलन, पीडितांच्या हक्कांचे संरक्षण तसेच कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी विविध प्रकरणांचे उदाहरण देत तपास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबतही चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक रामदास वाढे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केशव नागरे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना जाधव व नागरी हक्क संरक्षण पथकाच्या संपूर्ण स्टाफने विशेष परिश्रम घेतले…

Related Articles

ताज्या बातम्या