20.3 C
New York
Thursday, June 18, 2026

Buy now

spot_img

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला बुलढाण्यात 58 जातींचा तीव्र विरोध; 2 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन*

बुलढाणा ब्रेकिंग

*अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला बुलढाण्यात 58 जातींचा तीव्र विरोध; 2 जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन*

*”अनुसूचित जात हेच वर्गीकरण कायम ठेवा” – 58 जातींची मागणी; राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन…*

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला जिल्ह्यातील 59 पैकी 58 जातींच्या प्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला असून “अनुसूचित जात हेच वर्गीकरण कायम ठेवावे” अशी ठाम भूमिका घेतली आहे. उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता असून केंद्र व राज्य शासनाने जाती-जातींमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे षडयंत्र थांबवावे, अशी मागणी सकल आंबेडकरी समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना धक्का पोहोचेल असे कोणतेही निर्णय शासनाने घेऊ नयेत, असे मत समाजातील विविध घटकांनी व्यक्त केले आहे. अनुसूचित जातींना मिळालेला घटनात्मक दर्जा हा सामाजिक न्याय, समान संधी आणि प्रतिनिधित्व यासाठी महत्त्वाचा असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विभाजन करण्याचा प्रयत्न टाळावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे.
या पार्श्वभूमीवर 2 जून रोजी बुलढाणा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या या मोर्चामध्ये जिल्हाभरातील 58 जातींचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, पुरुष, तरुण, युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात येणार आहे. या निवेदनात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करावे, विद्यमान वर्गीकरण कायम ठेवावे आणि समाजात तेढ निर्माण करणारे निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या मोर्चामुळे जिल्ह्यात उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर व्यापक जनजागृती होणार असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या