23.8 C
New York
Friday, June 19, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धाडसी छापा; कारखाना उध्वस्त..*

बुलढाणा फ्लॅश

*बुलढाण्यात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धाडसी छापा; कारखाना उध्वस्त..*

*ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात धडक कारवाई; आंबेडकर नगरातील अवैध दारू निर्मितीवर आळा..*

बुलढाणा शहरातील आंबेडकर नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर बुलढाणा पोलिसांनी धडक कारवाई करत दारूचा कारखाना उध्वस्त केला. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आंबेडकर नगर येथे हातभट्टी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. छापेमारीदरम्यान अवैध दारू निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करून कारखाना उध्वस्त केला.
या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या