21.7 C
New York
Friday, June 19, 2026

Buy now

spot_img

महाबीजने सोयाबीन बीजोत्पादनाचा कोटा वाढवावा; विनायक सरनाईक यांची मागणी, आंदोलनाचा इशारा

बुलढाणा

महाबीजने सोयाबीन बीजोत्पादनाचा कोटा वाढवावा; विनायक सरनाईक यांची मागणी, आंदोलनाचा इशारा

‘महाबीजला सोयाबीन देऊन शेतकऱ्यांनी चूक केली का?’; कोटा कपातीवर सरनाईक यांचा सवाल…

चिखली तालुका राज्यातील सोयाबीन बीजोत्पादनात अग्रेसर असतानाही महाबीजने खरीप 2026 साठी बीजोत्पादनाचा कोटा मोठ्या प्रमाणात कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांनी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देत चिखली तालुक्याचा मागील वर्षीप्रमाणे 9,853 हेक्टरचा कोटा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीन बियाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रमाणित व पायाभूत बियाण्याचा अतिरिक्त कोटा उपलब्ध करून देण्याची तसेच पेरणीपूर्वी बियाणे वितरण सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसह महाबीज कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या