27.5 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

अमृतमार्फत टायपिंग व शॉर्टहँड प्रशिक्षणासाठी ८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले*

बुलढाणा

*अमृतमार्फत टायपिंग व शॉर्टहँड प्रशिक्षणासाठी ८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले*

शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून टायपिंग व शॉर्टहँड प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थी तसेच युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेण्यासाठी दि. ८ जून २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन अमृत कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

सध्या अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन व पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक माहिती व कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. टायपिंग व शॉर्टहँड हे रोजगाराभिमुख कौशल्य मानले जाते. शासन, निमशासकीय, न्यायालयीन तसेच खासगी क्षेत्रातील विविध रोजगार संधींसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी व युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्रमांक ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा ४४३००१ येथे किंवा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी यांच्याशी ९११२२२७६३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

ताज्या बातम्या