*समाजसेवक ॲड. अमोलकुमार गवई यांचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश…*
क्रांतिकारी शेतकरी संघटना यांच्या विचार आणि संघर्षाची भूमिका दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून आज दि 12.6.26 रोजी बुलढाणा येथील समाजसेवक ॲड. अमोलकुमार गवई यांनी आपल्या सहकारी मित्रांसह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या हस्ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला.
क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. सामान्य नागरिकांच्या अडचणी व जनसेवेत सक्रिय असलेले ॲड. अमोलकुमार गवई यांच्यासारखे अभ्यासू, सामाजिक जाण असलेले नेतृत्व संघटनेसोबत जोडले जाणे ही आनंदाची बाब आहे. असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. त्यांच्यासोबत ॲड. प्रविण दादा सुरडकर, ॲड. गुणवंत नाटेकर, ॲड. अक्षयअप्पा तोत्रे, ॲड. राम अंभोरे, सुमित जुमडे, भूषण सोनुने, शाम सपकाळ यांनी देखील प्रवेश करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेला बळकटी दिली.ॲड. अमोलकुमार गवई व त्यांच्या सहकारी मित्र प्रवेशामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेची ताकद अधिक वाढली असून शेतकरी, कष्टकरी, युवक आणि सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठीचा लढा आणखी व्यापक होणार आहे.क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लावलेले रोपटे आता वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून जनतेचा वाढता विश्वास हीच आमच्या संघर्षाची खरी ताकद आहे. असा विश्वास तुपकर यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



