24 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांची मोठी पाऊलवाट!*

बुलढाणा ब्रेकिंग

*महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांची मोठी पाऊलवाट!*

*’दामिनी’ पथकांना सुसज्ज चारचाकी वाहने; जिल्ह्यातील 5 उपविभागांत सेवा सुरू*

बुलढाणा जिल्ह्यात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘दामिनी’ पथकांना सुसज्ज चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम आज पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे पार पडला. महिला सुरक्षा व सक्षमीकरणाच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व उपविभागांत दामिनी पथके कार्यरत असून शाळा, महाविद्यालये, महिला वसतिगृहे, बसस्थानके, रेल्वे स्थानके व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून संवेदनशील गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम ही पथके करत आहेत. या नव्या वाहनांमुळे बुलढाणा, खामगाव, देऊळगाव राजा, मलकापूर आणि मेहकर येथील दामिनी पथकांची कार्यक्षमता अधिक वाढणार असून महिलांच्या सुरक्षेला आणखी बळ मिळणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या