23.1 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोका प्रकरणातील अट्टल गुन्हेगार जेरबंद… पाठलाग करून दोघांना अटक; २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर विविध जिल्ह्यांत गंभीर गुन्हे दाखल…

बुलढाणा ब्रेकिंग

मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोका प्रकरणातील अट्टल गुन्हेगार जेरबंद…

पाठलाग करून दोघांना अटक; २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपीवर विविध जिल्ह्यांत गंभीर गुन्हे दाखल…

मेहकर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोका प्रकरणातील अट्टल गुन्हेगाराला पकडत मोठी कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक बंकेश्वर आलेवार यांना मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड-सोनाळा रोडवर लाल रंगाच्या MH-31-FA-5820 क्रमांकाच्या डॅटसन रेडी-गो कारमधून काही अट्टल गुन्हेगार प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून वाहनाला गंगणपूर फाट्याजवळ अडविले. यावेळी तीन आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन आरोपींना शिताफीने पकडण्यात आले, तर एक आरोपी फरार झाला.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी आपली नावे अमोल परशा भोमले (वय २५, रा. वरखेड, ता. मेहकर) आणि अजय दशरथ भोमले (वय २६, रा. वरखेड) अशी सांगितली. वाहनाची झडती घेतली असता चार धारदार चाकू, एक मोबाईल फोन आणि डॅटसन रेडी-गो कार असा एकूण २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वरखेड, अक्कळी व सुकळी परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. प्राथमिक चौकशीत अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अमोल भोमले हा बुलढाणा, वाशीम आणि लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर शस्त्र बाळगणे, चोरी, घरफोडी, दरोडा तसेच इतर गंभीर गुन्ह्यांचे एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये चार धारदार चाकू, एक मोबाईल फोन आणि संशयित डॅटसन रेडी-गो कारचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक बंकेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक आणि मेहकर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. फरार आरोपीचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या