23.4 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

शिंदी गावावर दुःखाचा डोंगर, अवघ्या २४ तासांत तिघांचा मृत्यू;…. *शिंदी गाव शोकसागरात बुडाले*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*शिंदी गावावर दुःखाचा डोंगर, अवघ्या २४ तासांत तिघांचा मृत्यू;….

*शिंदी गाव शोकसागरात बुडाले*

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी गावावर अवघ्या एका दिवसात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २४ तासांच्या आत तीन ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाल्याने संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून प्रत्येक घरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुलाबराव माधवराव खरात (७८) यांचे ब्रेन हॅमरेजनंतर उपचार सुरू असताना निधन झाले. त्याच रात्री ताराबाई भिकनसिंग राजपूत (७९) यांची हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. या दुःखातून गाव सावरत नाही तोच शुक्रवारी भुजंगराव बाजीराव खरात (७०) यांचे एसटी बसमधून प्रवास करताना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलग तीन मृत्यूंच्या घटनांमुळे शिंदी गावावर शोककळा पसरली असून अंत्यसंस्कारावेळी अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले. गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे नागरिकांमध्ये हळहळ आणि दुःखाची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या