22.9 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या दोन घंटागाड्यांचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण..* *’गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे’; आमदार गायकवाड यांचे आवाहन…*

बुलढाणा

*सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या दोन घंटागाड्यांचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण..*

*’गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे’; आमदार गायकवाड यांचे आवाहन…*

गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने सुंदरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने जनसुविधा योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या दोन कचरा संकलन घंटागाड्यांचे लोकार्पण आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे गावातील घरोघरी नियमित कचरा संकलनाला गती मिळणार असून स्वच्छता अभियानाला मोठी चालना मिळणार आहे.
सुंदरखेड गावात स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीने जनसुविधा योजनेअंतर्गत दोन घंटागाड्या उपलब्ध करून घेतल्या आहेत. या घंटागाड्यांच्या माध्यमातून घराघरातील कचऱ्याचे नियमित संकलन करण्यात येणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासही मदत होणार आहे. गाव स्वच्छता अभियानात सुंदरखेड आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी स्वच्छता ही केवळ ग्रामपंचायतीची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा तसेच गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सरपंच सौ. अपर्णाताई राजेश चव्हाण, अरुण शिरसाठ, विजय ईल्लकर, अनंता लहासे, राजेश काळवाघे, सुनील गवई, विनोद तळेकर, शिवा वंतरम, शुभम पऱ्हाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी ग्रामपंचायतीच्या स्वच्छता उपक्रमाचे स्वागत केले. गावाच्या स्वच्छता व्यवस्थेत हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी सुंदरखेड घडविण्यासाठी सक्रिय सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या