27.1 C
New York
Monday, August 10, 2026

Buy now

spot_img

शेतकरी योद्धा कृती समितीचा पहिला विजय! देवानंद सोसे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; निवड होताच शाळा परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात

बुलढाणा

शेतकरी योद्धा कृती समितीचा पहिला विजय!
देवानंद सोसे यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; निवड होताच शाळा परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात…

पळसखेड चक्का : जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पळसखेड चक्का येथे आयोजित पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक सदस्य देवानंद विष्णू सोसे यांची अध्यक्षपदी, तर रूपालीताई संदीप मुंढे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, पदाची जबाबदारी स्वीकारताच नवनिर्वाचित समितीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेली घाण व वाढलेले गवत जेसीबीच्या साहाय्याने हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
गावातील दोन वस्त्यांमधून शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई–नागपूर महामार्गालगतून प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन महामार्गालगत वाढलेले मोठमोठे गवत व झुडपेही जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करताना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
निवड झाल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या कामाची ही पहिली पायरी ठरली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता या विषयांवर आगामी काळात प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा पालक व ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या शेतकरी योद्धा कृती समितीने आता शैक्षणिक क्षेत्रातही आपले पहिले पाऊल टाकले आहे. देवानंद सोसे यांच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावी काम केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष : देवानंद विष्णू सोसे
उपाध्यक्ष : रूपालीताई संदीप मुंढे
सदस्य : पल्लवीताई गोपाल धायतडक, प्रवीण सुखदेव जाधव, वर्षाताई श्रीकृष्ण मुंढे, संजीवनी सचिन मुंढे, रामेश्वर दिनकर मुंडे, एकनाथ प्रल्हाद काकड आणि शिवकन्या पांडुरंग सोसे.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे पालक, ग्रामस्थ, शिक्षक तसेच शेतकरी योद्धा कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे….

Related Articles

ताज्या बातम्या