23.1 C
New York
Friday, August 14, 2026

Buy now

spot_img

संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुलढाणा जिल्ह्यात भक्तिमय स्वागत!….* *एसपी निलेश तांबे यांची पालखीसोबत ५ किलोमीटर पायी वारी; पोलिस विभागाकडून अनोख्या पद्धतीने स्वागत*

बुलढाणा ब्रेकिंग

*संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुलढाणा जिल्ह्यात भक्तिमय स्वागत!*

*एसपी निलेश तांबे यांची पालखीसोबत ५ किलोमीटर पायी वारी; पोलिस विभागाकडून अनोख्या पद्धतीने स्वागत*

आषाढी एकादशीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या व पंढरपूर वरून परतीच्या मार्ग करीत संत गजानन महाराज यांची पालखी जिल्ह्याच्या सीमेवर सिंदखेडराजा तालुक्यात दाखल झाली .. संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुलढाणा जिल्ह्याच्या सरहद्दीवर भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदा पालखी सोहळ्याचे ५७ वे वर्ष असून, परतीच्या मार्गावर असलेल्या पालखीचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी संत गजानन महाराजांच्या श्रीमुखाला पुष्पमाला अर्पण करून भावपूर्ण दर्शन घेतले. यावेळी पालखीतील महाराजांच्या प्रतिनिधींचा रुमाल व पुष्पमाला देऊन सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पालखीसोबत तब्बल ५ किलोमीटर पायी वारी करत संत गजानन महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. पोलिस विभागाकडून पालखीचे अशा अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आल्याने उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले. तसेच श्री चि पालखी ओडथ सेवा सिद्ध दिली…
पालखीच्या स्वागतासाठी पोलिस अधिकारी-कर्मचारी तसेच असंख्य भाविक उपस्थित होते. टाळ-मृदंगाचा गजर, ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेत संत गजानन महाराजांच्या चरणी श्रद्धा अर्पण केली.
पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वातावरणात भक्तीचा रंग भरला असून, भाविकांच्या श्रद्धा आणि उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या