12.4 C
New York
Monday, October 19, 2026

Buy now

spot_img

संवेदना प्रतिष्ठान ग्रुपचा चिखलदरा येथे दोन दिवसीय अभ्यास दौरा; निसर्ग, आदिवासी जीवन आणि बदलत्या हवामानाचा करणार सखोल अभ्यास* *चिखलदरा पर्यटन विकासाचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांना सादर करणार अहवाल; तज्ज्ञ व महिला अधिकारी वर्गाचा सहभाग*

बुलढाणा ब्रेकिंग

*संवेदना प्रतिष्ठान ग्रुपचा चिखलदरा येथे दोन दिवसीय अभ्यास दौरा; निसर्ग, आदिवासी जीवन आणि बदलत्या हवामानाचा करणार सखोल अभ्यास*

*चिखलदरा पर्यटन विकासाचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांना सादर करणार अहवाल; तज्ज्ञ व महिला अधिकारी वर्गाचा सहभाग*

बुलढाणा येथील संवेदना प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने चिखलदरा या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात चिखलदरा परिसरातील पर्यटनस्थळांना भेटी देऊन तेथील नैसर्गिक वातावरण, पर्यटनाच्या उपलब्ध संधी तसेच स्थानिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान परिसरातील आदिवासी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या जीवनशैली, समस्या, पारंपरिक ज्ञान आणि पर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या संधींबाबत माहिती घेतली जाणार आहे. तसेच चिखलदरा परिसरातील बदलते हवामान, त्याचा निसर्ग आणि स्थानिक जीवनावर होणारा परिणाम याचाही अभ्यास केला जाणार आहे.
या दोन दिवसीय दौऱ्यात प्रा. कंकाळ, बी.के. इंगळे, कैलास मोरे, क्षीरसागर, खंडारे, प्रशांत इंगळे आणि प्रकाश जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सहभागी होत आहेत. महिला अधिकारी वर्गाचाही या अभ्यास दौऱ्यात सहभाग असून, त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चिखलदरा परिसरातील पर्यटन विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, आदिवासी समाजाचा सहभाग आणि बदलत्या हवामानाचा परिणाम या विविध बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यातून पुढील उपाययोजनांबाबत सूचना करण्यात येणार आहेत.
दोन दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यानंतर संपूर्ण अभ्यासाचा सविस्तर अहवाल तयार करून तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे हा दौरा केवळ पर्यटनभेट न राहता चिखलदरा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या