बुलढाणा
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरमध्ये साहित्यिकांची मांदियाळी!…
नामवंत कवी नितीन चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मेझवानी गझल-कवितांची’ कार्यक्रमाचे आयोजन
मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकर येथे साहित्यिक आणि काव्यरसिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकता ग्रुप, मेहकर यांच्या वतीने ‘मांदियाळी साहित्यिकांची – मेझवानी गझल-कवितांची’ या साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता कृषी वैभव लॉन, मेहकर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला नामवंत विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बुलढाणा-अकोला जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक, कवी आणि लेखकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या साहित्यिक कार्याची ओळख मेहकर शहरातील नागरिकांना करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात गझल आणि कवितांची विशेष मेजवानी साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमात डॉ. गणेश गायकवाड, शिवाजी जवर, नजीम खान, रमेश आराख, प्रा. गोपाल मापारी, जयदीप विझे यांच्यासह बुलढाणा, मेहकर आणि अकोला परिसरातील अनेक साहित्यिक, कवी आणि लेखक सहभागी होणार आहेत.
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आगळ्यावेगळ्या साहित्यिक उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक एकता ग्रुप, मेहकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



