10.3 C
New York
Sunday, October 18, 2026

Buy now

spot_img

सरकारची ८० कोटींची थकबाकी; राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील MRI-CT स्कॅन सेवा ठप्प..* *चार दिवसांपासून रुग्णांचे हाल! थकीत बिलांसाठी कंपनीचा ‘सेवा बंद’चा निर्णय; उपचारांची जबाबदारी कोणाची?…*

बुलढाणा ब्रेकिंग –

*सरकारची ८० कोटींची थकबाकी; राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील MRI-CT स्कॅन सेवा ठप्प..*

*चार दिवसांपासून रुग्णांचे हाल! थकीत बिलांसाठी कंपनीचा ‘सेवा बंद’चा निर्णय; उपचारांची जबाबदारी कोणाची?…*

अँकर
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील MRI आणि CT स्कॅन तपासणी सेवा गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत.

शासनाकडे संबंधित कंपनीची तब्बल ८० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. या थकीत देयकांमुळे कंपनीने MRI आणि CT स्कॅन सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
MRI आणि CT स्कॅन या गंभीर आजारांचे निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या तपासण्या आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना तपासणीअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, जोपर्यंत शासनाकडून थकीत देयकांचा भरणा केला जात नाही, तोपर्यंत MRI आणि CT स्कॅन सेवा सुरू न करण्याची भूमिका कंपनीने घेतली आहे.
एका बाजूला शासनाची कोट्यवधींची थकबाकी, दुसऱ्या बाजूला कंपनीचा सेवा बंद करण्याचा निर्णय आणि या सगळ्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य रुग्ण!
सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना आता बाहेरून महागड्या दराने तपासण्या करून घ्याव्या लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे थकीत बिलांचा आर्थिक वाद रुग्णांच्या आरोग्यावर का लादला जातोय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

MRI-CT स्कॅनसारखी अत्यावश्यक तपासणी सेवा तातडीने सुरू करण्यासाठी शासन काय पाऊल उचलणार? ८० कोटींच्या थकबाकीचा तिढा कधी सुटणार आणि रुग्णांना पुन्हा शासकीय रुग्णालयातच तपासणीची सुविधा कधी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या