10.2 C
New York
Monday, October 19, 2026

Buy now

spot_img

*बुलढाण्यात १४ ऑक्टोबरला महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव!…..* *गांधी भवनात वामनदादांच्या गीतांचा महाप्रबोधनात्मक जलसा; ९० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!…*

बुलढाणा

*बुलढाण्यात १४ ऑक्टोबरला महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव!…..*

*गांधी भवनात वामनदादांच्या गीतांचा महाप्रबोधनात्मक जलसा; ९० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!…*

*महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव २०२६ चे आयोजन; नामवंत गायकांच्या गीतांचा होणार बहारदार कार्यक्रम!*

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सवानिमित्त तसेच ९० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बुलढाणा येथे बुधवारी, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वामनदादांच्या गीतांचा महाजलसा’ असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून, बुद्ध, शिवराय, फुले आणि भीम यांच्या विचारांचा जागर गीतांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता गांधी भवन, जयस्तंभ चौक, बुलढाणा येथे पार पडणार आहे. उत्सवाचे हे दहावे वर्ष असून, सामाजिक प्रबोधन, समता आणि परिवर्तनाचा विचार जनमानसात रुजविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकबाजा शाहू फाउंडेशन, बुलढाणाचे अध्यक्ष दादासाहेब काटकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमेश घेवंदे राहणार आहेत. कार्यक्रमाला विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये वत्सलाबाई जनार्दन गवई, शाहीर डी. आर. इंगळे, दामोदर बिडवे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, नितीन सिरसाट, प्रा. डी. आर. माळी, इंजि. विजय मोरे आणि आशीष खरात यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
याशिवाय अर्जित हिरोळे, राहुल कासारे, निलेश गायकवाड, प्रतीक दिलीपराव जाधव, विजय राजपूत, अमोल खुरे, अॅड. वैशाली ठाकरे, विनोद एच. इंगळे आणि दिलीप राजभोज यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
या गीतांच्या महाजलशामध्ये चैतन्य चौपडे, अजय दहाडे, विकास सावळे आणि आशावरी लोखंडे हे गायक आपल्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘स्वरांग’ म्युझिक बँड वाद्यवृंदाची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक कुणाल पैठणकर असून, ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या परिवर्तनवादी गीतांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक समता, बंधुता आणि प्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे. या महाजलशाला नागरिकांनी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आणि गीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या