16.2 C
New York
Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

पोलीस अधीक्षक विश्व् पानसरे यांचे नेतृत्वात अवैध धंद्यांविरुध्द धडक कार्यवाहीचा सपाटा कायम…* ‘ *एका आठवड्यात’ दारुबंदी-288 तर जुगारच्या-137 केसेस., 12,13,784/-रु.चा मुद्देमाल जप्त.*

बुलढाणा ब्रेकिंग

*पोलीस अधीक्षक विश्व् पानसरे यांचे नेतृत्वात अवैध धंद्यांविरुध्द धडक कार्यवाहीचा सपाटा कायम…* ‘

*एका आठवड्यात’ दारुबंदी-288 तर जुगारच्या-137 केसेस., 12,13,784/-रु.चा मुद्देमाल जप्त.*

इंडीयन प्रिमीयर लिग IPL सट्टा, जुगार (वरली मटका), अवैध व विनापरवाना देशी-विदेशी दारु, गावठी हा.भ. दारु या व ईतर अवैध धंदे करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करुन, जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी यांना आदेशीत केले होते. आदेशाप्रमाणे अपोअ श्रेणिक लोढा, बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा जिल्हा, पोनि. श्री. अशोक एन. लांडे स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी आपले कार्यक्षेत्रामध्ये अवैध व विनापरवाना दारु, जुगार संबंधाने कार्यवाहीसाठी विशेष पथके तयार करुन, सदरच्या पथकांना वरिष्ठांकडून प्राप्त आदेशाप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सुचित केले होते

पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे यांचे आदेशानुसार दि.31/03/2025 पासून दि.06/04/2025 (एकूण 07 दिवसांमध्ये) जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंद्याविरुध्द विशेष मोहिम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार 291 आरोपी विरुध्द 288 केसेस दाखल करुन 10,48,148/-रु.चा अवैध व विनापरवाना देशी-विदेशी आणि गावठी हा. भ. दारुचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार 152 आरोपी विरुध्द 137 केसेस कार्यवाही करुन 1,65,636/-रु.चा जुगार मुद्देमाल जप्त केला. एकंदरीत, जिल्ह्यात अवैध दारु व जुगार संबंधाने बुलढाणा पोलीस दलाने एकूण 443 आरोपी विरुध्द 425 केसेस कार्यवाही करुन, त्यामध्ये एकूण 12,13,784/-रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…. पोलीस विभागाच्या धडक कारवाई मुळे अवैध धंदे करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे…

Related Articles

ताज्या बातम्या