29.3 C
New York
Thursday, April 16, 2026

Buy now

spot_img

अजितदादांचे बुलढाणा जिल्हा विकासात अमूल्य योगदान.. सामूहिक श्रद्धांजली सभेत मान्यवरांच्या शोकदग्ध भावना !

अजितदादांचे बुलढाणा जिल्हा विकासात अमूल्य योगदान..
सामूहिक श्रद्धांजली सभेत मान्यवरांच्या शोकदग्ध भावना !

बुलढाणा:
जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्राला गती देण्यासाठी विविध प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी, सिंदखेडराजा व शेगाव विकास आराखडा पूर्णत्वास नेण्यासाठी, भोन स्तूप विकसित करण्यासाठी तर नैसर्गिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुलढाणा जिल्हा विकासासाठी निभावलेली भूमिका ही न विसरण्यासारखी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र केवळ थांबला चालू असून २५ वर्षे मागे गेला आहे, अनेक कार्यकर्त्यांचे नेतृत्व त्यांनी घडविले आहे.. अशा शोकदग्ध भावना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मान्यवरांनी व्यक्त करत, बुलढाणा येथील गांधी भवनाच्या प्रांगणात शुक्रवारच्या सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून अर्पण केली मावळलेल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली !

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना आज ३० जानेवारी रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सामूहिक शोकसभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न तळमळीने सोडविणारे नेते म्हणून त्यांचा अनेकांनी उल्लेख कधी करून काही आठवणी सांगितल्या. सर्वप्रथम सहकार नेते डॉ. राजेंद्र शिंगणे व आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्याहस्ते अजितदादांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

त्यानंतर वकील संघातर्फे ॲड. विजय सावळे, पत्रकारांतर्फे अरुण जैन, मोईन काझी, कुणाल पैठणकर, अनुजाताई सावळे, मंदार बाहेकर, डॉ. राजेश्वर उबरहंडे, लक्ष्मणराव घुमरे, विजय अंभोरे तुकाराम अंभोरे पाटील, आ. धीरज लिंगाडे, आ. संजय गायकवाड, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली
अर्पित केली.

आ. संजय गायकवाड यांनी दादांच्या कार्यशैलीचा, नेतृत्वगुणांचा आणि सामान्य कार्यकर्त्यांप्रती असलेल्या आपुलकीचा उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर डॉ. राजेंद्र शिंगणे अजितदादांशी असलेल्या ३२ वर्षाच्या राजकीय व सामाजिक ऋणानुबंधाचा भावनिक आढावा घेऊन जिल्ह्याचे विकासातील दादांचे योगदान सांगितले.

या श्रद्धांजली सभेस जयश्रीताई शेळके, ओमसिंग राजपूत, नरेश शेळके, मृत्युंजय गायकवाड, अनुजा सावळे, ओमसिंग राजपूत, सुमित सरदार, गजेंद्र दांदडे, जिजाबाई राठोड, मयुरी देशपांडे, संतोष आंबेकर, बाबासाहेब जाधव, अनिल वर्मा, प्रा. डी. एस. लहाने, जितेंद्र एन. जैन, दत्ता काकस, दीपक रिंढे, आशिष जाधव, श्रीकांत गायकवाड, विजय राजपूत, रणजितसिंह राजपूत, प्रमिला गवई, श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरपालिकेचे नगरसेवक व सभापती मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी तर सामूहिक श्रद्धांजलीचे संचलन पत्रकार राजेंद्र काळे यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांनी “स्व. अजितदादा पवार यांना कोटी-कोटी भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पण करत मौन बाळगले.

Related Articles

ताज्या बातम्या