24 C
New York
Saturday, August 8, 2026

Buy now

spot_img

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित गोदाम भाड्याप्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा… अस्तित्व संघटनेच्या मागणीची दखल; प्रलंबित भाडे अदा व स्टोरेज दरवाढीची केंद्राकडे मागणी

बुलढाणा ब्रेकिंग 
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रलंबित गोदाम भाड्याप्रश्नी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरावा…

अस्तित्व संघटनेच्या मागणीची दखल; प्रलंबित भाडे अदा व स्टोरेज दरवाढीची केंद्राकडे मागणी

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोदाम भाड्याच्या प्रश्नावर केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. अस्तित्व संघटनेच्या निवेदनानंतर या प्रश्नाची दखल घेण्यात आली असून, प्रलंबित भाडे तातडीने अदा करणे आणि स्टोरेज दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सविस्तर बातमी :
शेतकरी उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि पुरवठा विभागाकडून अनेक वर्षांपासून गोदामांचे भाडे मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रेमलता सोनोने यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली होती.
निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बँकांकडून मोठे कर्ज घेऊन किंवा स्वतःची गुंतवणूक करून गोदामांची उभारणी केली आहे. ही गोदामे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि पुरवठा विभागाला भाडेतत्त्वावर देण्यात आली असली, तरी अनेक वर्षांपासून भाडे थकित असल्याने कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
सध्या मिळणारे भाडेदरही अत्यल्प असल्याने गोदामांची देखभाल, कर्मचारी व प्रशासकीय खर्च, नवीन कृषी प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच बँक कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होत असून ग्रामीण भागातील कृषीपूरक उपक्रमही अडचणीत आले आहेत.
यामुळे संवर्धनसृष्टी फार्मर प्रोड्युसर कंपनीसह इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वतीने प्रलंबित गोदाम भाडे तातडीने अदा करावे, स्टोरेज दरांचे पुनर्निर्धारण करून त्यात वाढ करावी आणि कंपन्यांना आर्थिक दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू केल्याचे समोर आले आहे. या पाठपुराव्यामुळे सकारात्मक निर्णय झाल्यास राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या