बारामती..
*अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात; शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या जयश्रीताई शेळकेंची बारामतीत सांत्वनपर भेट..*
महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभावी भूमिका बजावणारे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकमग्न झाले आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे…
या दुःखद घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी बारामती येथे जाऊन दिवंगत अजितदादांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी अजितदादांच्या पत्नी व राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, सुनंदाताई पवार तसेच आमदार रोहितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांचे दुःख जाणून घेतले आणि धीर दिला….
या भेटीदरम्यान जयश्रीताई शेळके यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “अजितदादा हे कणखर नेतृत्व, प्रशासनावर पकड आणि विकासाभिमुख दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, लोकहितासाठी झटणारा नेता गमावला आहे.”
यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज्याच्या राजकारणात पक्षभेदापलीकडे जाऊन सर्वच नेत्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. अजितदादा पवार यांच्या स्मृती आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या…



