2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

कृषी समृद्धी केंद्रांच्या मागण्यांवर निर्णयासाठी आमदार मनोज कायंदे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र..* *शेतकऱ्यांच्या ३ प्रमुख मागण्यांवर तातडीने बैठक बोलवण्याची मागणी…* *समृद्धी महामार्गावरील केंद्रांमुळे कृषी संपन्नतेला चालना मिळणार…*

*बुलढाणा ब्रेकिंग..*

*कृषी समृद्धी केंद्रांच्या मागण्यांवर निर्णयासाठी आमदार मनोज कायंदे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र..*

*शेतकऱ्यांच्या ३ प्रमुख मागण्यांवर तातडीने बैठक बोलवण्याची मागणी…*

*समृद्धी महामार्गावरील केंद्रांमुळे कृषी संपन्नतेला चालना मिळणार…*

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्र (नवनगर) संदर्भात शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख मागण्यांवर शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी आमदार मनोज नंदुताई कायंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, समृद्धी महामार्गाच्या परिसरातील नव्या बाजारपेठांच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
समृद्धी महामार्गावरील एकूण कृषी समृद्धी केंद्रांपैकी नवनगर अंतर्गत तीन केंद्रांचे प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यासंदर्भातील अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे. या केंद्रांमध्ये धोत्रे, लखागंगा, बाबतरा, पुरणगाव, धायगाव, जांबरगाव, सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव, नरीराबाद
या भागांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे… शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास त्वरीत संपादन प्रक्रिया सुरू होऊन कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीला गती मिळेल, तसेच उर्वरित केंद्रांच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास आमदार कायंदे यांनी व्यक्त केला आहे… त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे…

Related Articles

ताज्या बातम्या