3.4 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा बायपास–राजूर घाट मार्गावरील सर्विस रोडवर अतिक्रमण; रस्त्याच्या कामावेळी कारवाई अटळ….*

बुलढाणा ब्रेकिंग

*बुलढाणा बायपास–राजूर घाट मार्गावरील सर्विस रोडवर अतिक्रमण; रस्त्याच्या कामावेळी कारवाई अटळ….*

बुलढाणा शहरातून घाटाकडे जाणाऱ्या बायपास मार्गासह चिखली इतर ठिकाणी असलेल्या सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. या मार्गांवरील सर्विस रोड मूळ आराखड्यातच समाविष्ट असल्यामुळे वेगळ्या अधिग्रहणाची गरज नसली तरी प्रत्यक्षात अनेकांनी रस्त्याच्या हद्दीत बांधकामे उभी केली आहेत. या रस्त्याची रुंदी सुमारे 80 ते 40 फूट इतकी असताना प्रत्यक्ष वापरासाठी तो फक्त सुमारे 50 फूटच उरल्याची स्थिती आहे. काही ठिकाणी तर रिंग रोड अथवा सर्विस रोड म्हणून राखीव असलेल्या जागेवर लोकांनी 30 ते 37 फूट क्षेत्रात घरे व इतर बांधकामे केली आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते ही बांधकामे रस्त्याच्या हद्दीत असल्यामुळे भविष्यात मुख्य रस्त्याचे काम सुरू झाल्यावर ती हटविण्याची कारवाई अपरिहार्य ठरणार आहे. संबंधितांनी केलेली बांधकामे सर्विस रोडच्या जागेवर असल्याने रस्ते विकास प्रक्रियेदरम्यान ती हटवावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान, बायबॅक प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याच्या कामांना गती मिळाल्यास या अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे….

Related Articles

ताज्या बातम्या