बिग ब्रेकिंग
*भोंदू बाबा प्रकरणावरून राजकीय वाद पेटला; हर्षवर्धन सपकाळ यांचे गंभीर आरोप…*
खरात फाईल्स ची कसून चौकशी केल्यास डझन् भर मंत्री व डझन भर अधिकारी जेल् मध्ये जातील…!
*हर्षवर्धन सपकाळ यांनी केले ट्विट….*

मुंबई/बुलढाणा
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये सपकाळ यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात प्रामाणिक चौकशी झाली तर अनेक मंत्री आणि अधिकारी तुरुंगात जाऊ शकतात….
सपकाळ यांनी आरोप केला की, २०१८ साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अशोक खरात यांच्या इशानेश्वर मंदिरासाठी सुमारे १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तसेच तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि सध्याचे म्हाडा अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही खरात यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा दावा त्यांनी केला….
याशिवाय, अमित शाह यांच्यासोबतचे फोटो समोर आल्याचा उल्लेख करत, मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही खरात यांच्याशी निकट संबंध असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. काही नेत्यांनी अघोरी पूजा केल्याचेही आरोप त्यांनी केले….
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती आधीपासून असूनही कारवाई करण्यात उशीर झाल्याचा आरोप करत, राजकीय दबाव आणि अंतर्गत मतभेदांमुळेच उशिरा कारवाई सुरू झाल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे….
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



