बुलढाणा ब्रेक
ज्वलंत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी वाद निर्माण – जयश्री शेळके यांची टीका….
मराठी अस्मितेवर आघात सहन नाही; उबाठा प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांचा इशारा..
राज्यात सध्या गॅस दरवाढ, पेट्रोल-डिझेल टंचाई, वाढत्या रांगा आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान असे अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण झाले असताना, यापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण केले जात असल्याचा आरोप उबाठा पक्षाच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केला आहे.
मराठी भाषेबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, हा केवळ भाषेचा नव्हे तर मराठी अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे वक्तव्य करून समाजात संभ्रम आणि तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, मराठी भाषेचा किंवा मराठी अस्मितेचा कोणताही अवमान सहन केला जाणार नाही. जनतेसमोरील खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.



