29.2 C
New York
Friday, August 7, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यातील तणावावर पोलिसांचे यशस्वी नियंत्रण… जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नियोजनाला यश; वाद कायदेशीर मार्गाने सोडवणार..

बुलढाणा

बुलढाण्यातील तणावावर पोलिसांचे यशस्वी नियंत्रण…

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नियोजनाला यश; वाद कायदेशीर मार्गाने सोडवणार..

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर अखेर पोलिसांनी प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. एका पुस्तकावरून राज्यभर निर्माण झालेल्या वादामुळे जिल्ह्यातही वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या कुशल नियोजनामुळे परिस्थिती हाताळण्यात यश आले.
गेल्या आठवडाभरात या वादावरून विविध स्तरांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या गेल्या. काही ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. बाहेरील जिल्ह्यांतून बुलढाण्यात येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांनी बारीक लक्ष ठेवत योग्य वेळी कारवाई केली. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकारांना आळा बसला.
पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळाले.
दरम्यान, संबंधित वाद आता निवळला असून पुढील लढाई कायदेशीर मार्गाने लढली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तरीही पोलिसांवरील ताण कायम असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
सध्या जिल्ह्यात शांतता प्रस्थापित झाली असून मोठी गुन्हेगारी घटना टळल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या