*बुलढाणा फ्लॅश*
*राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम…*
*शाळांची स्वच्छता, सुशोभीकरणासह किरकोळ दुरुस्तीवर भर; विद्यार्थ्यांकडून वर्गणी घेण्यास मनाई…*
अँकर
राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान नियोजन, पाहणी आणि कृती आराखडा तयार करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि शाळा परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक किरकोळ दुरुस्ती, सुशोभीकरण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जातील. या मोहिमेत शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, मोहिमेवरील खर्च समग्र शिक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून करण्यात येणार असून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची अनिवार्य वर्गणी किंवा निधी गोळा करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.



