5.9 C
New York
Sunday, October 18, 2026

Buy now

spot_img

*‘मिशन परिवर्तन’अंतर्गत शेगाव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक..* *२० किलो ५६० ग्रॅम गांजासह दुचाकी, चारचाकी व मोबाईल असा १० लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त*

*बुलढाणा ब्रेकिंग*

*‘मिशन परिवर्तन’अंतर्गत शेगाव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक..*

*२० किलो ५६० ग्रॅम गांजासह दुचाकी, चारचाकी व मोबाईल असा १० लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त*

जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध बुलढाणा पोलिसांनी ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेअंतर्गत शेगाव ग्रामीण पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २० किलो ५६० ग्रॅम गांजासह एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सवर्णा शिवारात कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी ‘मिशन परिवर्तन’ राबविण्यात येत आहे. गांजासह इतर अमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक, उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. या अनुषंगाने १८ ऑक्टोबर २०२६ रोजी शेगाव ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शेगाव ते खामगाव मार्गावरील ग्राम सवर्णा शिवारात काही इसम गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगून आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सवर्णा शिवारात छापा टाकून संशयितांविरुद्ध कारवाई केली. दोन आरोपी अटकेत; २० किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त..
या कारवाईत हुसेन खान युसूफ खान (वय २५ वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक १२, शेगाव) आणि आसिफ खान एजाज खान (वय २९ वर्षे, रा. ईदगाह प्लॉट, शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २० किलो ५६० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १० लाख २६ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाहने आणि मोबाईलसह १० लाख ९६ हजारांचा मुद्देमाल
पोलिसांनी गांजासह पुढील मुद्देमाल जप्त केला आहे.
गांजा : २० किलो ५६० ग्रॅम, किंमत १० लाख २६ हजार रुपये.

मोपेड अ‍ॅक्सिस कंपनीचे वाहन (क्रमांक MH-28-BY-3169) : २५ हजार रुपये.

कावासाकी बॉक्सर कंपनीचे वाहन (क्रमांक MH-30-K-9884) : २५ हजार रुपये.

दोन मोबाईल : २० हजार रुपये.

अशा प्रकारे एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) मधील कलम ८(क) व २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) आणि अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पथक तसेच संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी ‘मिशन परिवर्तन’अंतर्गत पोलिसांकडून कारवाई सुरू असून, अशा अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Related Articles

ताज्या बातम्या